पायल तडवी आत्महत्या प्रकरण : एक डॉक्टर अटकेत
महा एमटीबी   28-May-2019


 

मुंबई : नायर रुग्णालयातील वरिष्ठ महिला डॉक्टरांच्या रँगिगला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या डॉ. पायल तडवी या प्रकरणातील ताब्यात घेण्यात आलेल्या एका महिला डॉक्टरला अटक झाली आहे. डॉ. भक्ती मेहर, असे या डॉक्टरचे नाव आहे.

 

या प्रकरणातील तिन्ही डॉक्टरांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. यी चिंग लिंग यांच्यासह वरिष्ठ निवासी डॉक्टर हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्यावर पायलच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप आहे.

 

नायर रुग्णालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालाच्या आधारे या चौघींवर ठपका ठेवण्यात आला आणि त्यांच्यावर सोमवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. डॉ. पायल तडवीच्या आत्महत्या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली आहे.

 

राष्ट्रीय महिला आयोगाने नायर रुग्णालयाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली. आत्तापर्यंतच्या कारवाईबाबत आयोगाला सूचित करण्यासही सांगितले आहे. दरम्यान, नायर रूग्णालयाबाहेर विविध संघटनांकडून पायलच्या आत्महत्येविरोधात निदर्शने सुरू आहेत. पालिकेच्या विविध रूग्णालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनीही आज आंदोलन केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat