'ते’ पोस्टर शिवसेनेने उतरवले
महा एमटीबी   27-May-2019 


मुंबई : मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करणारे बॅनर हटवण्यात आले आहे. सोशल मीडियावर काहींनी ही गंभीर चूक लक्षात आणून दिल्यानंतर युवासेनेने हे बॅनर हटवले. राहुल कनल या युवासेनेच्या अतिउत्साही पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अपमान केला होता. त्याने मतदारांचे आभार मानण्यासाठी एक बॅनर छापला होता या बॅनरमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापला होता.

 

 
 

प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांचा फोटो हा उद्धव ठाकरेंच्या आधी असायला हवा होता. मात्र या बॅनरवर आदित्य व उद्धव ठाकरेनंतर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापण्यात आला होता. यावर भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत राहुलचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर आपली चूक लक्षात आल्यानंतर राहुल कनलने हे बॅनर हटवले आहे. दरम्यान, या बॅनरवरून ट्विटरवरही चांगलेच ट्विटरयुद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले.

 
 

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat