मुख्यमंत्र्यांच्या अपमानामुळे टि्वटरयुध्द पेटले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |




मुंबई : लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर महाराष्ट्रासह देशभरात उत्साह सुरु आहे. एनडीएच्या या विजयाचा मुंबईतही मोठा उत्साह दिसून येत आहे. याच उत्साहात युवासेनेच्या एका कार्यकर्त्याने अतिउत्साहीपणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अपमान केला. राहुल कनल असे या युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने नाव आहे.

 

राहुल कनलने मतदारांचे आभार मानण्यासाठी एक बॅनर छापला होता. या बॅनरवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापला. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांचा फोटो हा उद्धव ठाकरे यांच्या आधी असायला पाहिजे. मात्र या बॅनरवर उद्धव व आदित्य ठाकरेनंतर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापला. यावर भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत राहुलचा चांगलाच समाचार घेतला.

 

मुख्यमंत्र्यांना अपमानित केल्याचा हा बॅनर अल्पावधीतच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर या बॅनरवरून ट्विटरवरही चांगलेच ट्विटरयुद्ध रंगले. मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे, असे खडेबोल मुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थकांनी युवासेनाला सुनावले. त्यामुळे आता युवासेना या कार्यकर्त्यावर काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@