संघ स्वयंसेवकाने माउंट एवरेस्टवर फडकावला भगवा
महा एमटीबी   27-May-2019
उत्तर प्रदेश : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुरादाबादचा सह महानगर कार्यवाह व गिर्यारोहक विपीन चौधरी याने माउंट एव्हरेस्ट मोहीम फत्ते केली. माउंट एव्हरेस्टची चढाई केल्यानंतर विपीनने संघाचा भगवा ध्वज व भारताचा तिरंगा फडकावला. विपिनच्या या कामगिरीचे देशभरातून स्वागत होते आहे.


विपीनने २ एप्रिल रोजी माउंट एव्हरेस्टच्या चढाईला सुरुवात केली होती. त्याच्यासोबत १२ गिर्यारोहकांची टीम होती. अडथळ्यांवर मात करत त्याने २२ मे रोजी सकाळी ९ वाजता माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करत भगवा ध्वज व भारताचा तिरंगा फडकावला.


२७ वर्षाच्या विपीनने यापूर्वी त्याने एल्ब्रुस आणि किलीमंजारो हे पर्वतही सर केले आहेत. मुरादाबादच्या बुद्धि-विहारमध्ये तो आपल्या कुटुंबियांसोबत राहत असून येथील केजीके कॉलेजमध्ये तो वकिलीचे शिक्षण घेत आहे. आपल्या अभ्यासासोबत रा. स्व. संघातही कार्यरत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat