उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघ
महा एमटीबी   23-May-2019

 

 

ईशान्य मुंबई या मतदारसंघामध्ये कधीही सलग एका पक्षाचा खासदार निवडून आला नाही. पण, यंदा या मतदारसंघाने हे सूत्र साफ नाकारले आणि इथे पुन्हा भाजपचाच खासदार निवडून आला. र प्रत्यक्ष निवडणूक निकाल वगैरेंच्या आधीही वादळी चर्चेत हा लोकसभा मतदारसंघ होता. कोण जिंकणार, यापेक्षाही भाजप कोणाला तिकीट देणार, यावर अक्षरशः वादळ उठले होते. त्यानंतर नाट्यमयरित्या भाजपचे मुंबई महानगरपालिकेचे गटनेता मनोज कोटक यांना तिकीट जाहीर झाले. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते छातीठोकपणे आम्हीच जिंकणार,’ असे सांगत होते. कारण, संजय पाटील यांनी मनोज कोटक यांच्या खूप आधीपासून प्रचाराला सुरुवात केली होती. संजय पाटील हे २००९ साली खासदार म्हणून जिंकून आले होते. या पार्श्वभूमीवर प्रचाराला कमी वेळ मिळाला असतानाही मनोज कोटक यांनी विजयाची माळ आपल्या गळ्यात टाकली. कारण, भाजपचे गटनेता म्हणून मनोज कोटक यांचा जनसंपर्क चांगलाच होता. भाजपचे संघटन तसेच जिल्ह्याचे इतर पक्षीय राजकारण आणि प्रश्न यांची मनोज कोटक यांना चांगलीच जाण होती. मतदार संघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभावही पाहायला मिळाला.

 

या मतदारसंघात घर घर मोदी अभियान’, ‘शतप्रतिशत भाजप अभियानगेली तीन वर्षे सुरूच होते. त्याचा लाभ मनोज कोटक यांना झाला. दुसरीकडे संजय पाटील यांचा जनसंपर्क या मतदारसंघात होता, पण राष्ट्रवादीचा प्रभाव या मतदारसंघात नगण्यच! त्यातही इथल्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना नेहमीच राष्ट्रवादीचा खासदार का, असा प्रश्न पडलेला. त्याचाही फटका इथे राष्ट्रवादीला बसला. या मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीनेही आघाडी घेतली. २०१४ साली इथे भाजपने ६०.९० आघाडी घेत बाजी मारली होती. नोटाचा हा परिणाम असावा. मात्र तरीही खासदार म्हणून मनोज कोटक यांच्यावरच्या जबाबदार्‍या वाढल्या आहेत. कारण, ईशान्य मुंबईमध्ये नव्या खासदाराचा, पर्यायाने नव्या नेत्याचा उदय म्हणून युतीच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनीही मनोज कोटक यांना संधी दिली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat