लोकसभा निवडणूक २०१९ : सातव्या टप्प्यासाठी ६०.२१ टक्के मतदान
महा एमटीबी   19-May-2019


 


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज ८ राज्यांमधील ५९ जागांसाठी मतदान घेण्यात येत आहे. या टप्प्यात एकूण ९१८ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. दरम्यान, सर्व सातही टप्प्यातील मतमोजणी २३ मे रोजी करण्यात येणार आहे. पंजाबमधील १३, उत्तरप्रदेशातील १३, बंगालमधील ९, बिहार आणि मध्यप्रदेशातील प्रत्येकी ८, हिमाचल प्रदेशातील ४, झारखंडमधील ३ आणि चंदीगढमधील एका जागेसाठी शेवटच्या टप्प्यात मतदान घेण्यात येत आहे.

 

पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. इतर राज्यांमध्ये मतदान सुरळीतपणे चालू आहे. सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६०.२१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

 

बिहार - ४९.९२ टक्के

हिमाचल प्रदेश - ६६.१८ टक्के

मध्य प्रदेश ६९.३८ टक्के

पंजाब - ५८.८१ टक्के

उत्तर प्रदेश ५४.३७ टक्के

प. बंगाल - ७३.०५ टक्के

झारखंड - ७०.५ टक्के

छत्तीसगड - ६३.५७ टक्के

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat