भारतातील पहिला तंत्रशिक्षण पदवीदान सोहळा पार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2019
Total Views |



मुंबई : देशभरात विविध मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, विद्यालयांचे पदवीदान समारंभ पाहिले आहेत. परंतु, टीव्ही, फ्रिज, एसी, मोबाईल, दुचाकी-चारचाकी वाहने दुरुस्तीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा 'पदवीदान' सोहळा कधी पाहिला नसेल. 'तंत्रशिक्षण हे अत्यावश्यक शिक्षण आहे' हा संदेश विद्यार्थी तसेच सामान्यांपर्यंत पोहचावा म्हणून मुंबईतील कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटने शनिवारी राज्यातील तसेच राज्याबाहेरील एकूण ३४ शाखांमध्ये एकाच दिवशी, एकाच वेळी 'पदवीदान सोहळा' पार पाडून एक नवा पायंडा पाडला आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी कोहिनूर इन्स्टिट्यूट ही भारतातील पहिलीच तंत्रशिक्षण संस्था ठरली आहे.

 

सर्व ३४ शाखांमध्ये मिळून तब्बल ८०० विद्यार्थ्यांना विविध तंत्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल गौरविण्यात आले. यापैकी ठाणे, अंबरनाथ, कुर्ला, भिवंडी व नेरुळ अशा पाच शाखांमधील विद्यार्थ्यांचा ठाणे शाखेत, प्रमुख पाहुणे प्रवीण वडावकर व कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मकरंद वागास्कर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

 

"केटीआयच्या प्रशिक्षणाचे मॉडेल हे पूर्णपणे अनुभवाधारित आहे- म्हणजेच प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेलं शिक्षण. या अनुभवाचाच एक भाग म्हणजे हा प्रमाणपत्रदान सोहळा आहे. यामुळे मुलांनी त्यांच्या आवडीचे कौशल्यशिक्षण पूर्ण केल्याचं समाधान आणि नोकरीस पात्र झाल्याचा अभिमान त्यांना वाटेल. म्हणूनच प्रमाणपत्र देण्याच्या साध्या घटनेचा सुंदर सोहळा साजरा करण्यावर आम्ही भर दिला." असे मत कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मकरंद वागास्कर यांनी व्यक्त केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@