मोदींना विरोधकांचीच खरी मदत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2019
Total Views |
आपल्या प्रचारसभांमधून देशाच्या कानाकोपर्यात जाऊन देशाच्या सुरक्षेचा मुद्दा मोदींनी लावून धरला. इकॉनॉमिस्टच्या मते, या प्रचाराचा लोकांवर विशेषतः तरुणांवर सकारात्मक परिणाम झाला असून, त्यामुळे मोदींना हरविणे विरोधी पक्षांना सोपे नाही. त्यामुळेच मोदी पुन्हा सत्तेवर येतील, असे विश्लेषण त्यांनी केले आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना उद्देशून कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानपदाचे स्वप्न सोडा, तुमची कुवत केवळ चहा विकण्याची आहे. अकबर रोडवरील कॉंग्रेस मुख्यालयाबाहेर आम्ही जागा देऊ, चहाची टपरी टाका, अशी अश्लाघ्य टिप्पणी करून मोदींचा अपमान केला होता. परिणामी कॉंग्रेसच्या 44 जागांपर्यंतच्या अभूतपूर्व घसरणीला अनेक कारणांपैकी हे एक कारण झाले होते. आता पुन्हा, तेव्हा जे बोललो होतो ते योग्यच होते, असे म्हणत मणिशंकर अय्यरांनी परत एकदा लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात कॉंग्रेसला गोत्यात आणले आहे. हे कमी म्हणून की काय म्हणून राहुल गांधींचे गुरू आणि सल्लागार सॅम पित्रोदा यांनी 1984 च्या शिखांच्या शिरकाणाबद्दल ‘हुआ सो हुआ’ असे बेदरकार विधान करून पित्रोदा यांनी शीखबहुल मतदारसंघांत कॉंग्रेसची कबर खोदली असून कॉंग्रेससाठी सेल्फ गोल करत भाजपला दिल्ली, हरियाणा आणि पंजाबच्या जागा जिंकणे अधिक सोपे केले आहे.
 
 
 
तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी तर पिसाळल्यासारख्या झाल्या आहेत. मोदींना मी पंतप्रधान मानत नाही, त्यांच्या मुस्कटात मारावी असे वाटते अशी बहुमताने निवडून आलेल्या लोकप्रिय पंतप्रधानांवर केलेल्या टीकेने 42 पैकी 23 जिंकण्याचा विश्वास असलेल्या भाजपाला अधिक जागा जिंकण्यासाठी मदतच करीत आहेत. मायावतींनी तर अजून खालची पातळी गाठली आहे. मोदींनी आपल्या पत्नीला सोडल्याने भाजप पुरूष कार्यकर्त्यांच्या पत्नींना आपले नवरे सोडून देतील अशी भीती वाटते. त्यामुळे अशा बायकांनी मोदींना मते देऊ नयेत. या अजब तर्काला काय म्हणावे?
 
इकडे पवार साहेब बारामतीत अनपेक्षित निकाल लागल्यास ईव्हीएमवर शंका घेत लोकांचा मतदान प्रक्रियेवरील विश्वास उडेल व मोदी सरकार 13 दिवसच टिकेल अशी भविष्यवाणी वर्तवत मोदीच सत्तेवर येणार हेच दर्शवित आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोदीविरुद्ध सगळे अशी स्थिती मोदींना निर्माण करायची होती आणि त्यात ते शंभर टक्के यशस्वी झाले आहेत. त्यांचा करिष्मा बघता परत 272 जागा मिळवण्याचे मिरॅकल ते करू शकतात.
 
सोनिया गांधींनी मोदींना ‘मौतका सौदागर’ संबोधल्याने कॉंग्रेसला फटका बसला होता, हे विसरून राहुल आणि प्रियंका गांधी हे कॉंग्रेसचे वरिष्ठ नेतेही मोदींवर घाबरट, देशद्रोही, चोर, भ्रष्टाचारी अशी वैयक्तिक टीका करीत आहेत. मोदी बोलतात ते केवळ राजकीय कारकिर्दीवर, आधीच्या सरकारच्या भ्रष्टाचारावर. मोदींचे भाऊ अजूनही किराणा दुकानासारखे छोटे व्यवसाय करतात, ज्यांची आई छोट्याशा फ्लॅटमधे राहते आणि ज्यांनी कुठलीही प्रॉपर्टी करणे सोडाच, आपल्या पगारातील पैशातून केलेली बचतसुद्धा कार्यालयातील कर्मचार्यांच्या व सफाई कर्मचार्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दान केली अशा निस्पृह माणसावर राहुल गांधींनी चोरीचे व भ्रष्टाचाराचे आरोप करून स्वतःचे हसू तर करून घेतलेच, पण मोदींना निवडणूक जिंकणे अधिक सोपे केले आहे.
 
2014 च्या वेळचे ओपिनियन आणि एक्झिट पोल पाहता, संपुआचे भ्रष्टाचारी सरकार जाणार हे सर्वजण एकसुरात बोलत होते. पण, एकट्या भाजपाला बहुमत मिळेल असे कुणीही गृहीत धरले नव्हते. नंतर सहा महिन्यांनी घेतलेल्या काही ओपिनियन पोल्सनी मोदींची लोकप्रियता वाढवीत भाजपाला तीनशेच्या वर व एनडीएला साडेतीनशेच्या वर जागा मिळतील असे अंदाज वर्तवले होते. मोदींची लोकप्रियता शिखरावर असताना उत्तरप्रदेश विधानसभेत एनडीएला अभूतपूर्व सव्वातीनशे जागा मिळाल्या होत्या. भाजपच्या कर्नाटकातील पराभवानंतर ही लोकप्रियता कमी होत राजस्थान, मध्यप्रदेश आणि झारखंड मधील पराभवाने आणखी घसरली व आपण लढू शकतो हा विश्वास विरोधकांमध्ये निर्माण झाला. त्यानंतर मोदींनी घडवून आणलेला सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा हल्ल्यानंतर थेट पाकिस्तानमधे घुसून बालकोटवर केलेला यशस्वी हवाई हल्ला व जगाने भारताने केलेली कारवाई योग्य असल्याची दिलेली पावती, यामुळे घसरू लागलेली मोदींची लोकप्रियता परत पहिल्या उच्च पातळीवर पोचली. वरील काही संदर्भ बघता परत एकदा मोदी सरकार येणार हे स्पष्ट दिसते आहे. फक्त भाजपाला गेल्यावेळी मिळालेल्या 282 जागांत वाढ होऊन मोदी-शहा म्हणतात तसा 300 जागांचा टप्पा पार करणार काय, हाच प्रश्न आहे.
 
या देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असतानाच, जगाचेही लक्ष या निवडणुकांवर आहे. लंडनच्या सुप्रसिद्ध द इकॉनॉमिस्टने आपल्या अनेक बातमीदारांना भारतात पाठवून भारतातील राजकीय हवेचा अंदाज घेऊन नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील असा अंदाज वर्तविला आहे.
 
इकॉनॉमिस्टने आपल्या विश्लेषणात्मक वृत्तान्तात विविध पक्षांना मिळू शकणार्या जागांविषयीही अंदाज बांधले आहेत. त्यानुसार 2014 च्या निवडणुकीत 282 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 220 ते 232 जागा मिळतील असे म्हटले आहे. भाजपच्या सहकारी पक्षांना 2014 मध्ये 54 जागा मिळाल्या होत्या. यावेळी 41 ते 51 च्या दरम्यान मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या वेळी कॉंग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्या फारतर 74 ते 84 पर्यंत जातील, मात्र कॉंग्रेस सरकार स्थापन करू शकणार नाही. कॉंग्रेसच्या सहकारी पक्षांना गेल्या वेळी 15 जागा मिळाल्या होत्या. यावेळी पवारांची राष्ट्रवादी, तामिळनाडूतील द्रमुक धरून या पक्षांना 37 ते 47 जागा मिळू शकतील. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या आघाडीला सर्वाधिक फायदा होताना दिसत आहे. गेल्या वेळी या दोन्ही पक्षांना मिळून केवळ 5 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्या पक्षांना 37 ते 47 पर्यंत जागा मिळू शकतात. डाव्या पक्षांची स्थिती अधिक कमकुवत झाली आहे. गेल्या वेळी त्यांना 12 जागा मिळाल्या होत्या. यावेळी डावे 5 वरच अडखळतील अंदाज वर्तविण्यात आला आहे. अन्य पक्षांना गेल्या वेळी 131 जागा मिळाल्या होत्या. यात तृणमूल कॉंग्रेस बिजू जनता या मोठ्या पक्षांचा समावेश आहे. त्यांना यावेळी 88 ते 98 जागा मिळतील, असा इकॉनॉमिस्टचा अंदाज आहे. या कमी झालेल्या जागा भाजपाच्या खात्यात जाऊन हिंदी पट्ट्यात विशेषतः उत्तर प्रदेशात होणारे नुकसान भरून निघेल असा अंदाज आहे. या वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार, मोदींनी ज्या प्रकारे संपूर्ण देशभरात राष्ट्रवादाची लाट निर्माण केली, ती पाहता त्यांचा पक्ष पुन्हा सत्तेत येण्याचा मार्ग सोपा झाला आहे. गेल्या वेळी केवळ 44 जागा मिळविणार्या कॉंग्रेसच्या जागा फारशा वाढतील, असे दिसत नसले, तरी सभागृहातील कॉंग्रेसची ताकद निश्चित वाढेल.
 
मोदी शहांनी देशभरात पोचविलेल्या राष्ट्रवादाचा, सबका साथ-सबका विकास वादाचा सकारात्मक परिणाम मतदारांवर होऊ शकतो. छोटे व्यापारी आणि शेतकरी मोदींवर नाराज आहेत, ही बाब काही अंशी खरी आहे; परंतु ते अखेरीस त्यांनाच मते देतील, असा इकॉनॉमिस्टचा अंदाज आहे. अगदीच मागील वेळेसारखे स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही, तरी सरकार बनवण्याएवढ्या जागा मोदींना निश्चित मिळतील, असा त्यांचा तर्क आहे. इकॉनॉमिस्टच्या मते, मोदींनी राष्ट्रवाद आणि देशाची सुरक्षितता हे मुद्दे आधीपासूनच महत्त्वाचे मानले. त्यात पुलवामा घटनेचा बदला घेतला जाईल, अशी घोषणा मोदींनी केली होती आणि काही दिवसांतच सुरक्षा दलांनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करून दहशतवाद्यांचे तळ बॉम्बवर्षावांनी नेस्तनाबूत केले. मोदी जे बोलतात, ते करून दाखवतात, अशी भावना त्यामुळे देशभरात निर्माण झाली. आपल्या प्रचारसभांमधून देशाच्या कानाकोपर्यात जाऊन देशाच्या सुरक्षेचा मुद्दा मोदींनी लावून धरला. इकॉनॉमिस्टच्या मते, या प्रचाराचा लोकांवर विशेषतः तरुणांवर सकारात्मक परिणाम झाला असून, त्यामुळे मोदींना हरविणे विरोधी पक्षांना सोपे नाही. त्यामुळेच मोदी पुन्हा सत्तेवर येतील, असे विश्लेषण त्यांनी केले आहे.
 
देशातील निवडणूक निकालावर सट्टा लावणार्यांचा अंदाजही कमीत कमी अडीचशे जिंकुन मोदीच पंतप्रधान होणार यावर ठाम आहेत. वर म्हटल्याप्रमाणे याचा सर्वात जास्त फायदा मोदींना होऊन कदाचित ते म्हणतात त्याप्रमाणे पेक्षा जास्त जागाही मोदींना मिळू शकतात. कारण उत्तर पूर्व भागात वाढलेले बळ, गेल्यावेळी बरोबर नसलेले नितीशकुमार व महाराष्ट्रात शिवसेनेशी झालेली युती, ममतादीदींच्या अतिरेकीपणाने मोदींना मिळणारा प्रतिसाद, ओडिशामध्ये झालेले भाजपानुकूल वातावरण पहाता मोदींची भविष्यवाणी खरी ठरू शकते. 23 मे काही फार लांब नाही.
विलास पंढरी
9860613872
@@AUTHORINFO_V1@@