'लक्ष्मी बॉम्ब' चे पहिले पोस्टर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2019
Total Views |


 

राघव लॉरेन्स दिग्दर्शित लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज प्रकाशित झाले आहे. अक्षय कुमार एका वेगळ्याच रूपात आपल्या समोर येत आहे. या चित्रपटामध्ये किआरा अडवाणी आणि अक्षय कुमार पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. पुढील वर्षी ५ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे देखील आज जाहीर करण्यात आले आहे.

 

लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाच्या हिंदी चित्रपट कंचाना या चित्रपटाचा रिमेक असून या चित्रपटाची कथा फरहाद सामजी यांनी लिहिली आहे. या चित्रपटात बऱ्याच काळानंतर आर. माधवन देखील या चित्रपटाच्या माध्यमातून पुनर्पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला एप्रिल महिन्यातच सुरुवात झाली आहे. हा चित्रपट एक विनोदी भयपट असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. 


या चित्रपटात अक्षय कुमार एका तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारणार असून किआरा अडवाणी त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा असून विशेष म्हणजे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन चित्रपट एका विनोदी भुताच्या पात्रात समोर येणार असल्याची देखील शक्यता व्यक्त होत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@