खुशखबर ! केदार जाधव विश्वचषक खेळणार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2019
Total Views |



मुंबई : विश्वचषकासाठी अवघे काही दिवस उरले असताना अखेर केदार जाधवच्या समावेशावरून पडदा उठला आहे. मधल्या फळीचा फलंदाज केदार जाधव फिट असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. त्यामुळे आता केदार जाधवचे आता विश्वचषकाचे दार खुले झाले आहे. भारतीय संघ २२ मेला इंग्लंडला रवाना होणार आहे. केदार जाधव अनफिट झाल्यास त्याच्या जागी ऋषभ पंतला घेण्याची मागणी पुढे येत होती. केदार जाधव फिट झाल्याने विश्वकरंडकात खेळण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी पंतला अजून वाट बघावी लागणार आहे.

 

आयपीएल दरम्यान पंजाबविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना केदारच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर केदार आयपीएल उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्यामुळे केदारच्या विश्वचषकातील सहभागाबाबत प्रश्ननिर्माण झाले होते. टीम इंडियाचे फिजीओथेरपिस्ट पॅट्रीक फरहात यांनी ही दुखापत गंभीर नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, दुखापत बरी होण्यास वेळ लागत असल्यामुळे केदारच्या वर्ल्डकप मोहिमेतील सहभागाबाबत प्रश्ननिर्माण झाले होते. गुरुवारी सकाळी फरहत यांनी बीसीसीआयला केदारचे रिपोर्ट पाठविले होते. त्यानंतर शनिवारी बीसीसीआयने त्याला फिट घोषित केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@