पाकिस्तानात मोकाट फिरत होता दहशतवादी : अखेर अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2019
Total Views |


नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवाही मक्की याला आज पाकिस्तान सरकारने अटक केली आहे. गेली कित्येक वर्षे उजळ माथ्याने फिरणाऱ्या मक्कीला आज अटक करून पाकिस्तानने अमेरिकेलाही अवाक करून सोडले आहे. ज्या प्रकारे त्याच्या बहीणीचा पती हाफिस सईद भारताविरोधात भाषणे ठोकत असतो. त्या प्रकारे मक्कीनेही भारताविरोधात भाषणबाजी सुरू केली होती. मात्र, पाकिस्तानविरोधी भाषण दिल्याबद्दल त्याला आता अटक करण्यात आली आहे. इमरान खान यांच्या सरकारसह पाकिस्तानातील आधीच्या सरकारांनाही त्याचा ठावठिकाणा माहीत होता. मात्र, त्याला अटक करून अमेरिकेकडे सुपूर्द करण्याची तयारी कोणत्याही सरकारने दर्शवली नव्हती. मात्र, अखेर मक्कीला अटक करण्यात आली आहे.

 

पाकिस्तानातील गुर्जर परिवारातील मक्की हाफिस सईदची इस्लामिक संघटना जमात-उल-दावा आणि इस्लामिक वेलफेअर ऑर्गनायझेशन अहल-ए-हदीथसह लष्कर-ए-तोयबामध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर कार्यरत आहे. त्याची विचारधाराही हाफिस सईदप्रमाणेच इस्लामिक रुल लागू करण्याच्या विचारांना समर्थन देत आहे. पाकिस्तानच्या गुजरांवाला येथून अटक केल्यानंतर लाहोर येथे हलवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या सामा टिव्ही Maintenance of Public Order Act अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

 

मक्कीला भारताच्या मागणीनुसार अमेरिकेने रिवॉर्ड़ फॉर जस्टीस अंतर्गत त्याच्यावर २० लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. तो तालीबानचा सुप्रीम कमांडर उमर आणि अलकायदा प्रमुख अल जवाहरी यांच्या जवळचा असल्याचे म्हटले जाते. पाकिस्तानात भारताविरोधात भाषण देण्याबद्दल तो प्रसिद्ध आहे. २०१० मध्ये पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यापूर्वी त्याने भारताविरोधात भाषण दिले होते.

 

पाक सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यात त्याने पुण्यात तीन ठिकाणीँ बॉम्ब स्फोट घडवण्याची माहिती दिली होती. अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यावेळी त्याने अमेरिकेला उघड धमकी दिली होती. अफगाणिस्तानात सुरू असलेल्या दहशतवादाविरोधातील अमेरिकेच्या कारवाईविरोधातही त्याने वक्तव्य केली आहेत. आपल्या भाषणांमध्ये तो नेहमी भारत आणि अमेरिकेविरोधात युद्ध आणि हल्ल्याच्या गोष्टी करत असतो. पाकिस्तानला त्यावेळी भारताने मक्कीविरोधात ठोस पुरावे देऊनही कोणतिही कारवाई करण्यात आली नव्हती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@