'मोगरा फुलला' चे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस
महा एमटीबी   15-May-2019श्रावणी देवधर दिग्दर्शित 'मोगरा फुलला' या चित्रपटाचे नवीन पोस्टर आज नुकतेच प्रकाशित करण्यात आले. स्वप्नील जोशी हा चित्रपट सृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. हे नवीन स्वप्नील जोशी आणि मिलिंद इंगळे यांच्यावर चित्रित आहे. या नव्या पोस्टरमधील आनंद इंगळे यांची भूमिका पूर्णपणे उघड नसली तरी ते एका बँकेतील कर्मचारी आहेत आणि जिव्हाळ्याचे नाते संबंध जपणारे असा अंदाज पोस्टरमध्ये लिहिलेल्या टॅगलाईन वरून आपण लावू शकतो. बँकेची खाती आणि आपुलकीची नाती दोन्ही जपावी लागतात अशी टॅगलाईन या पोस्टरमध्ये देण्यात आली आहे.
या पूर्वी स्वप्नील जोशी आणि संदीप पथक यांच्यातील मैत्री दर्शवणारे पोस्टर प्रकाशित करण्यात आले होते. 'मोगरा फुलला' या चित्रपटाची कथा आणि संवाद सचिन मोटे यांनी लिहिले असून चित्रपटातील 'मनमोहोनी' नावाचे गाणे देखील प्रदर्शित करण्यात आले आहे. हा चित्रपट येत्या १४ जूनला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

 

या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि आनंद इंगळे यांच्यासह चंद्रकांत कुलकर्णी, सई देवधर, नीना कुळकर्णी, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आनंद इंगळे, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat