एनडीएला तिनशेपेक्षा जास्त जागा मिळतील : अमित शाह
महा एमटीबी   15-May-2019नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बहुमताचा आकडा पार केला असून सातव्या टप्प्यातील मतदानाअंती भाजप तिनशे जागांचा टप्पा पार करेल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. भाजप किती जागा जिंकणार?, हा प्रश्न प्रसार माध्यमांकडून विचारला आहे. मात्र, भाजपने बहुमताचा आकडा सहाव्या टप्प्याअंतीच ओलांडला आहे, असे माझे उत्तर असेल असे शहा म्हणाले.

 

"मी प्रचारासाठी देश पिंजून काढला आहे, यादरम्यान नागरिकांचा जो प्रतिसाद पाहायला मिळाला आहे, तो पाहता भाजपला सातव्या टप्प्याअंती तिनशे पेक्षाही जास्त जागा मिळतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन होईल", असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

 

विरोधकांकडे पुरेसे संख्याबळही नसेल !

भाजप व नरेंद्र मोदींविरुद्ध महाआघाडीने २१ मे रोजी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, 'विरोधी पक्षांचा नेता निवडण्यासाठी बहुदा ही बैठक होत असेल', असा टोला शहा यांनी लगावला. विरोधी पक्षनेतेपदासाठी एखाद्या पक्षाला आवश्यक संख्याबळ यावेळीही विरोधकांपैकी कुणाकडे नसेल, असा दावाही शहा यांनी केला.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat