भारत करणार क्षेपणास्त्रांची निर्यात !
महा एमटीबी   15-May-2019 

सिंगापूर / नवी दिल्ली : भारत याच वर्षी स्वदेशी क्षेपणास्त्रांची निर्यात करण्याची शक्यता आहे. ही क्षेपणास्त्रे मुख्यतः दक्षिण पूर्व आशिया देशांची विक्री केली जाणार आहे. सिंगापूर येथे सुरू असलेल्या आयएमडीएक्स आशिया प्रदर्शन २०१९ दरम्यान ब्रम्होसचे मुख्य व्यवस्थापक एस.के.अय्यर यांनी ही माहीती दिली आहे. 'आम्ही आमच्या बाजूने संपूर्ण तयारी केली असून सरकारच्या मंजूरीची प्रतीक्षा आहे.'

 

कमांडर अय्यर यांच्यामते, भारताकडून क्षेपणास्त्र खरेदीसाठी दक्षिण पूर्व आशियातील देशांनी तयारी दर्शवली आहे. क्षेपणास्त्र विक्रीसाठी पहीली तुकडी तयार आहे, यातील सरकारी मंजूरी शिल्लक असल्याची माहीती मंगळवारी सिंगापूर येथे सुरू झालेल्या तीन दिवसीय आयएमडीएक्स आशिया प्रदर्शनात ही माहिती देण्यात आली. आंतरराष्ट्रीय सुरक्षा बाजारात भारतासाठी संधी उपलब्ध आहेत.

 

दक्षिण पूर्व आशिया भागातील देशांना संरक्षण क्षेत्रात गुंतवणूकीची गरज आहे. मात्र, मध्यम अर्थव्यवस्था असल्याने मोठ्या देशांकडून क्षेपणास्त्र विकत घेणे शक्य नाही. त्यामुळे या देशांनी भारतीय क्षेपणास्त्रे खरेदी करण्यास उत्सूकता दर्शवली आहे. भारतीय तंत्रज्ञानाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेने कमी असल्याने भारताला या क्षेत्रातील व्यापारासाठी संधी उपलब्ध आहे. आयएमडीएक्स आशिया प्रदर्शनात देशभरातील एकूण २३६ कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. जगभरातील १० हजार ६०० प्रतिनिधींनी यात सहभाग नोंदवला आहे. ३० देशांतील २३ युद्ध नौका येथे सादर करण्यात आल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat