'गेम ओव्हर' चा टीजर पाहून होईल गेम ओव्हर
महा एमटीबी   15-May-2019अश्विन सर्वणन दिग्दर्शित 'गेम ओव्हर' या चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित करण्यात आला. 'गेम ओव्हर' हा चित्रपट एक रोमांचक कथा असून यामध्ये मनमर्जीया फेम तापसी पन्नू मुख्य भूमिका साकारणार आहे. हा एक भयपट आहे असेही टीजर पाहिल्यावर आपण म्हणू शकतो. एका मानसिक दुविधेत असलेल्या मुलीची ही कथा अश्विन सर्वणन आणि काव्या रामकुमार यांनी लिहिली आहे.

 
 
 

'गेम ओव्हर' या चित्रपटाची निर्मिती एस. शशिकांत यांनी केली असून सह-निर्मिती चक्रवर्थी रामचंद्र यांनी केली असून चित्रपटाचे संवाद श्रुती मदन यांनी लिहिले आहेत. 'प्रत्येकाला दोन आयुष्य असतात आणि जेव्हा आपल्याला हे लक्षात येते की, आपले एक आयुष्य संपण्याच्या मार्गावर आहे तेव्हा आपल्याला आपल्या दुसऱ्या आयुष्याची चाहूल लागते' असे दृश्य या चित्रपटाच्या टीजरमध्ये दाखवण्यात आले आहे. यातून आपल्याला चित्रपटाचा मूळ प्लॉट लक्षात येत नाही मात्र यामुळे आपली उत्सुकता नक्कीच वाढते.


तापसी पन्नूला नेहेमीच आव्हानात्मक भूमिका स्वीकारताना आपण पहिले आहे. आता ही भूमिका देखील तिच्यापुढील एक आव्हानच आहे. हा चित्रपट येत्या १४ जून ला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू या तिन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat