घाऊक महागाईदरात घट
महा एमटीबी   15-May-2019नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार घाऊक महागाई दरात घट झाली आहे. एप्रिलमध्ये महागाई दर ३.०७ टक्क्यांवर आला आहे. मार्चमध्ये हा आकडा ३.१८ टक्के इतका होता. एप्रिल २०१८ रोजी घाऊक महागाई दर ३.६३ टक्क्यांवर पोहोचला होता.

 

भाजीपाल्याचा महागाई दर ४०.६५ टक्के

भाजीपाल्याच्या दरात वाढ होत असल्याचा परिणाम खाद्यपदार्थ्यांच्या दरावर झाला आहे. एप्रिल महिन्यात घाऊक महागाई दर ४०.६६ टक्के झाली आहे. मार्चमध्ये हा दर २८.१३ टक्के इतका होता. खाद्यपदार्थांचा घाऊक महागाई दर ७.३७ टक्के झाला आहे. मार्चमध्ये तो ५.६८ टक्के इतका होता. इंधन आणि उर्जा क्षेत्रातील महागाई दर ३.८४ टक्क्यांवर पोहोचले होते. त्यापैकी उत्पादन क्षेत्रातील वाढ १.७२ झाली आहे.

 

किरकोळ महागाई दर सहा महिन्यांच्या उच्चांकावर

केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भाजीपाला आणि खाद्यपदार्थ वस्तूंमध्ये भाववाढ झाल्याने किरकोळ महागाईदर २.९२ टक्के नोंदवण्यात आला आहे. आरबीआयच्या पतधोरण आढाव्यादरम्यान महागाई दरांकडेही लक्ष वेधले जाते. पुढील दर ४ ते ६ जून दरम्यान जाहीर केले जाणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat