अमिताभ बच्चन आणि आयुषमान एका स्क्रीनवर झळकणार
महा एमटीबी   15-May-2019भारतातील चित्रपट सृष्टीचा शेहेनशाह म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्याबरोबर आयुष्यात एकदा तरी काम करायला मिळावे अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. अंधाधुन फेम आयुषमान खुरानाची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असे दिसत आहे. सुजित सरकार दिग्दर्शित 'गुलाबो सीताबो' या आगामी चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आयुषमान पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. आयुषमान खुरानाने आपली उत्सुकता व्यक्त करत आज हे सोशल मीडियावर जाहीर केले.


'गुलाबो सीताबो' या चित्रपटाचे चित्रीकरण पुढच्या महिन्यापासून सुरु होणार आहे. मात्र सध्या आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर मोहिनी घालणारा आयुषमान आणि गेल्या कित्येक पिढ्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या अमिताभ बच्चन यांना मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना पाहायची उत्सुकता सगळ्यांनाच असेल.


दिग्दर्शक सुजित सरकार यांनी
'पिकू' मध्ये अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केले आहे तर विकी डोनर या चित्रपटासाठी आयुषमान बरोबर काम करण्याचा देखील त्यांना अनुभव आहे. त्यामुळे आता बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा सुजित सरकार यांची या दोघांबरोबरची केमेस्ट्री आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat