'८३' हिंदीसह तामिळ आणि तेलगू मध्ये देखील प्रदर्शित होणार
महा एमटीबी   15-May-2019


 

भारतात क्रिकेट हा खेळ नसून सर्वांच्या भावना या खेळाशी जोडलेल्या आहेत. त्यातही वर्ल्ड कप म्हटले तर त्यासाठी रोजच्या कामाचाही विसर आपल्याला पडू शकतो. अशाच १९८३ सालच्या वर्ल्डकपमधील भारताच्या विजयी कामगिरीवर आधारित '८३' हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू या तिन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले.


 

कबीर खान दिग्दर्शित '८३' या चित्रपटात रणवीर सिंह आयकॉनिक क्रिकेटर आणि तत्कालीन कप्तान कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील अँथम आघाडीचे संगीत दिग्दर्शक प्रीतम बनवणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियावाला, रिलायन्स एन्टरटेनमेन्ट आणि मधू मंटेना करणार आहेत.

या चित्रपटात रणवीर सिंह या अभिनेत्यासह ताहीर राज भसीन, जिवा, पंकज त्रिपाठी, साकिब सलीम, चिराग पाटील हे कलाकार देखील १९८३ सालच्या वर्ल्ड कपमधील भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट आगामी वर्षी म्हणजेच १० एप्रिल २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat