इंडियाज मोस्ट वॉन्टेड मधील 'वंदे मातरम' प्रदर्शित
महा एमटीबी   14-May-2019
'इंडियाज मोस्ट वोन्टेड' चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता फक्त १० दिवस बाकी आहेत. सर्व प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करेल असे एक नवीन गाणे आज प्रदर्शित करण्यात आले आहे. जे ऐकल्यावर आपोआपच तुम्ही भारतमातेला वंदन केल्याशिवाय राहणार नाही. हे गाणे पॅपॉन आणि अल्तमश फरीदी यांनी गायले आहे तर त्यांना राजीव सुंदरेसन, अरुण कामथ आणि सुहास सावंत यांनी कोरस गायला आहे. हे गाणे अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्द केले आहे. या गीताचे शब्द अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत.


 

लेखक आणि दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांनी आत्तापर्यंत रेड, नो वन किल्ड जेसिका सारख्या गंभीर चित्रपटांमधून त्यांच्या दिग्दर्शनाची झलक आपल्याला या आधी दिली आहे. अर्जुन कपूर आणि त्याच्याच सारख्या फार ज्ञात नसलेल्या नायकांची ही कथा आहे ज्यांनी भारतमातेच्या रक्षणाचा विडा उचलला आहे.

आता या मिशनमध्ये त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते आणि त्यातून ते मार्ग काढून इंडियाज मोस्ट वोन्टेडला गजाआड करण्यात कसे यशस्वी होतात याची ही कथा येत्या २४ मे पासून संपूर्ण भारतभर चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळणार आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat