पाकिस्तानची अर्थव्यवस्था खिळखिळी : आयएमएफकडे मागितले ४२ हजार कोटी
महा एमटीबी   13-May-2019


इस्लामाबाद : आधीच अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानचा भारताकडून मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आहे. त्यामुळे आपली ढासळती अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेकडे 'आयएमएफ' हात पसरले आहेत. अनेक अटी व शर्थी घालत आयएमएफने पाकिस्तानला ४२ हजार कोटींचे बेलआऊट पॅकेज दिले आहेत. पाकिस्तानला ही रक्कम ३९ महिन्यांसाठी देण्यात आली आहे. इमरान खान यांनी २९ एप्रिल रोजी बेल आऊट पॅकेजची मागणी केली होती. त्यानुसार ७ मे रोजी ही रक्कम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, अखेर १० मे रोजी पाकिस्तानला हे पॅकेज देण्यात आले आहे.

 

७०० अब्ज रुपयांची कर सवलत रद्द

पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी २०१८ रोजी आर्थिक मदतीची मागणी केली होती. प्रदीर्घ सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आयएमएफकडून अनेक अटी व शर्थी ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मदत मिळण्यास विलंब होत होता. पाकिस्तानला मिळणारी दोन वर्षातील ७०० अब्ज रुपयांची कर सवलत परत घ्यावी लागणार आहे.

 

पाकिस्तानातील महागाई वाढली

पाकीस्तानला दिली जाणारी सवलत काढून घेतल्याने देशात महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०१९-२० च्या अर्थसंकल्पानुसार, देण्यात आलेली ३५० अब्ज रुपयांची सवलत आता परत घेतली जाणार आहे.

 

व्यापार घटला

महागाई वाढल्याने पाकिस्तानातील जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेक देशांनी पाकिस्तानशी व्यापारी संबंध ठेवण्यात नाराजी व्यक्त केली आहे. व्यापार कमी झाल्याने महागाईदर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

 

विकासदर घटला

पाकिस्तानातील आर्थिक स्थिती नाजूक असल्याने विकासदरही मंदावला आहे. २०१८-१९ दरम्यान विकासदर ६.२ टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, सध्याचा विकासदर हा ३.३ टक्क्यांवर आला आहे. पाकिस्तानातील प्रमुख क्षेत्रांमध्ये ५० टक्क्यांनी घट नोंदवल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat