असे आहे इंडियाज मोस्ट वॉन्टेडचे नवीन पोस्टर
महा एमटीबी   13-May-2019 

सामान्य पण असामान्य अशा ५ व्यक्तींच्या शौर्याची कथा असलेल्या इंडियाज मोस्ट वॉन्टेडचे नवीन पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले. भारतावर संकटांचे सावट आणणारा मोस्ट वोन्टेड ओसामाचे विध्वंसक मनसुबे धुळीला मिळवून त्याला गजाआड करण्याच्या मिशनची, हे पाच सामर्थ्यवान लढवय्ये, त्यांच्या शौर्याची ही सत्यकथा आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर आज प्रकाशित करण्यात आले.


 

प्रभात कपूरच्या भूमिकेत अर्जुन कपूर, राजेश सिंग यांची भूमिका राजेश शर्मा त्याचबरोबर गौरव मिश्रा, असिफ खान, प्रसांथ अलेक्झांडर, संतीलाल मुखर्जी, बजरंगबली सिंह आणि प्रवीण सिंह अशी या चित्रपटाची स्टार कास्ट आहे. राजकुमार गुप्ता दिग्दर्शित इंडियाज मोस्ट वॉन्टेड या चित्रपटामधून एका आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याला पकडण्यासाठी आखण्यात आलेल्या मोहिमेबद्दल आपल्याला जाणून घेता येणार आहे.

अर्जुन कपूरला आपण आत्तापर्यंत रोमँटिक आणि हलक्या फुलक्या भूमिका करताना आपण पहिले आहे मात्र या चित्रपटात त्याची भूमिका अतिशय गंभीर आहे त्यामुळे ही भूमिका त्याच्यासाठी एक आव्हानच आहे. आता हे शिवधनुष्य तो कसे पेलवतो याचा निकाल येत्या २४ मे ला चित्रपट प्रदर्शित झाला की कळेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat