ट्रेंडीग :‘रफल’साड्यांचे कलेक्शन
महा एमटीबी   09-Apr-2019मुंबई : भारतीय फॅशन क्षेत्रातील मोठी बाजारपेठ असणा-या वूनिकने स्टाईल स्टेटमेंट ठरणाऱ्या रफल साड्यांचे कलेक्शन सादर केले आहे. साडीचा पदर आणि काठावरील ३ ते ४ इंचाचा झूलीचा स्तर साडीला आकर्षक रूप मिळवून देतो.


 पेस्टल कलर्स किंवा भडक रंगात या साड्या विशेष छान दिसतात किंवा नाजुक फुलाफुलाच्या प्रिंट्स मध्येही छान दिसतात. विशेषतः पार्टीसाठी हे कलेक्शन मोहक रूप मिळवून देते. या साडीसोबत एक छानसे कट-ब्लाऊज आणि कमीत कमी पण झोकदार आभूषणे घातलीत तर तुम्ही नक्कीच मोहक दिसाल.
वूनिकची ट्रेंडी रफल साड्यांचे हे कलेक्शन रु. ९९९ पासून वूनिकडॉटकॉमवर उपलब्ध आहे. भारतीय साड्यांचे विविध कलेक्शन परिधान करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी 'रफल' ट्रेंड्सच्या प्रेमातच पडली आहे. तिने ही स्टाइल अत्यंत ग्रेस आणि मादकतेने आपलीशी केली आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat