१७ एप्रिलला उलगडणार 'मिरांडा हाऊस'चे रहस्य
महा एमटीबी   08-Apr-2019मुंबई : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक राजेंद्र तालक 'मिरांडा हाऊस' हा रहस्यमय चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आयरिस प्रॉडक्शन निर्मित, मिलिंद गुणाजी, साईंकित कामत आणि पल्लवी सुभाष यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मराठी आणि कोकणी भाषेत सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

चित्रपटाच्या ट्रेलरवरून यात काहीतरी मोठी गुंतागुंत असणार हे नक्की. ट्रेलरवरून अनेक तर्कवितर्कही काढले जात आहेत. मात्र येत्या १७ एप्रिल रोजी या 'मिरांडा हाऊस'चे हे रहस्य उलगडणार आहे. राजेंद्र तालक यांनी यापूर्वी 'सावली', 'सावरिया.कॉम', 'अ रेनी डे' यांसारखे पठडीबाहेरचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. त्यामुळे या चित्रपटातही प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण पाहायला मिळणार अशी अशा बाळगायला हरकत नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat