दिव्याचा प्रकाश करी अंधाराचा नाश !
महा एमटीबी   04-Apr-2019


प्रत्येक भारतीय व्यक्तीची अशी धारणा असते की प्रत्येक लहानसहान कृतीचा आपल्या संस्कृतीशी परंपरेशी काहीतरी नातं आहे . दीपप्रज्वलन ही त्यापैकीच एक . एक छोटासा दिवादेखील आसमंत प्रकाशाने भरून टाकतो . अंधारात वाट हरवलेल्याला योग्य मार्ग दाखवतो. 'तमसो मा जोतिर्गमय '' अर्थात 'अंधाराकडून प्रकाशाकडे जाऊ या ' असं आपली संस्कृती सांगते . हा दिवा प्रज्वलित करणारं अग्नितत्व हे पंचमहाभूतांपैकी एक आहे .

 

आपल्या हिंदू धर्मात प्रकाश हा सकारात्मकतेचं , शुद्धतेचं प्रतीक आहे ,तर अंधार हा वाईट, दुष्ट शक्तीचं प्रतीक आहे. दिव्याची ज्योत ही अग्नितत्वाचं रूप असून ती अंधाराचा नाश करून सर्वत्र सकारत्मकता आणि शांती प्रदान करते. या दिव्याचा उजेड यशाकडे, उन्नतीकडे नेतो. म्हणूनच कोणत्याही कार्याची सुरुवात ही दीपप्रज्वलनाने केली जाते.

 

तिन्ही सांजेला घरातल्या देव्हाऱ्यात, तुळशीपाशी तेलाचा दिवा लावल्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरींचं संरक्षक आवरण तयार होतं असा उल्लेख विविध शास्त्रग्रंथात आढळतो. या सात्विक लहरींच्या आवरणामुळे घरातील व्यक्तींचं वातावरणातल्या अनिष्ट, दुष्ट शक्तींच्या स्पंदनांपासून रक्षण होत. या शक्ती संध्याकाळी आणि रात्रीच्या अंधारात अधिक कार्यरत होत असतात. त्यामुळेच सूर्यास्तापूर्वी घरात यावं आणि सूर्योदयापूर्वी घरातून बाहेर पडू नये असं म्हटलं जातं.

 

अग्निपुराणानुसार दिव्याकरिता तिळाच्या तेलाचा वापर केल्याने वातावरणातील दोष आणि दुष्ट शक्तींचा नाश होतो. गतकाळातील वाईट कर्मांमुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी तसेच ज्या व्यक्तींना दीर्घकाळापासून त्रास असतील अशांनी तिळाच्या तेलाचा दिवा नित्यनेमाने लावावा. साडेसाती , अंतर्दशा , महादशा या काळात संतुष्ट करण्यासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदेव संतुष्ट होऊन ग्रहदोष नाहीसे होतात शांती लाभते.

 

अशाप्रकारचा प्रकाश आणि तेज देणारं उत्पादन म्हणेज ,पितांबरीचं दीपशक्ती तेल .पितांबरीनं दीपशक्तीच्या रूपानं खास दिव्याकरिता अखाद्य स्वरूपात तीळ तेल उपलब्ध केल्यामुळे त्याची किंमतही सर्वांना परवडेल अशी झाली आहे. यामुळे तिळतेलाचा दिवा लावण्यामुळे मिळणारे ध्यात्मिक लाभ मिळू शकतील. दीपशक्ती तेलामुळे धूर होत नाही, तसेच या तेलाला वास येत नाही, आणि मनाला शांती मिळते. ध्यात्मिक भावजागृती होऊन एकाग्रता वाढते जी ईश्वर आराधनेसाठी पूरक ठरते.

चला या पितांबरी दीपशक्ती तेलाच्या वापरातून आपल्या घरातील देव्हारा शांत प्रकाशाने उजळून टाकू या !

 

 

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat