श्रीलंकेच्या समुद्र सीमेवर भारताचे डॉर्नियर विमान, जहाजे तैनात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2019
Total Views |


तटरक्षक दल हाय अलर्टवर


चेन्नई : श्रीलंका रविवारी आठ शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरल्यानंतर भारतीय तटरक्षक दलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून श्रीलंकेला लागून असलेल्या समुद्रसीमेवर गस्त वाढविण्यात आली आहे. श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवून आणणारे दहशतवादी समुद्रमार्गाने देशाबाहेर पळून जाऊ शकतात. त्यांना निसटून जाता येऊ नये यासाठी भारतीय तटरक्षक दलाने डॉर्नियर टेहळणी विमान आणि जहाजांची तैनात केली आहे.


तटरक्षक दलाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. मुंबईत २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तटरक्षक अतिरिक्त खबरदारी घेत आहे. मुंबईवर २६/११ हल्ला करणारे दहशतवादी समुद्रमार्गाने मुंबईत घुसले होते
श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणणार्‍या दहशतवादी संघटनेची ओळख पटली असून तौहीद जमात या स्थानिक दहशतवादी गटावर संशय आहे. ईस्टर संडेला घडवून आणलेल्या या बॉम्बस्फोटांमध्ये २९० निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. पाचशे जण जखमी झाले.

 

दरम्यान, ईस्टर संडेच्या रविवारी कोलंबोमधील सेंट सेबेस्टियन चर्चमध्ये एक संशयित आत्मघाती हल्लेखोर शिरतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाठीमागे एक मोठी बॅग अडकवून एक व्यक्ती चर्चमध्ये येताना दिसत आहे.


इसिसने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

इस्लामिक स्टेटने (इसिस) श्रीलंकेमध्ये झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोट मालिकेची जबाबदारी स्वीकारली आहे. रविवारी ईस्टर संडेला आठ बॉम्बस्फोटांनी श्रीलंकेला हादरवून सोडले होते. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत तिनशे पेक्षा अधिक निरपराध्यांचा मृत्यू झाला असून पाचशेपेक्षा अधिक जखमी झाले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@