दिल्लीत भाजप, आप कॉंग्रेस, अशी तिरंगी लढत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षातील जागावाटपाचा तिढा अखेर सुटलेला नाही. कॉंग्रेसने सोमवारी सहा उमेदवारांची यादी जाहीर केली. उत्तर पूर्व दिल्लीतून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना उमेदवारी दिली असून नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून अजय माकन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केल्याने दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र येणार नाहीत, असे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे दिल्लीत आता भाजप, आप आणि कॉंग्रेस, अशी लढत असणार आहे.

 

भाजपविरोधात एकत्र आलेल्या विरोधीपक्षांनी एकत्र येत उमेदवार उभे करण्यास सुरू केले असताना राजधानी दिल्लीत मात्र आप आणि कॉंग्रेस यांची चर्चा फिस्कटली आहे. काँग्रेसमधील दिल्लीतील नेत्यांनी आपसोबत आघाडी करण्यास विरोध दर्शवला. शीला दीक्षित यांनी आपसोबत आघाडी करण्यास विरोध दर्शवल्याने अखेर कॉंग्रेसने आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

काँग्रेसचा एक गट आपसोबत आघाडीसाठी अनुकूल होता. आघाडीबाबतचा निर्णय राहुल गांधींकडे सोपवण्यात आला होता. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना दोन्ही पक्षांमध्ये आघाडीबाबत निर्णय होत नसल्याने संभ्रम कायम होता. त्यातच भाजपने चार उमेदवारांची यादी जाहीर केल्याने कॉंग्रेसची अडचण होत झाली होती. आम आदमी पक्षानेही यापूर्वीच सात उमेदावारांची यादी जाहीर केल्याने आता आप आणि कॉंग्रेसच्या आघाडीची शक्यता संपुष्टात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@