साखळी बॉमस्फोट मालिकेने श्रीलंका हादरली; १५० जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2019
Total Views |




कोलोंबो : ईस्टर संडेचा उत्सव सुरु असताना श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाने हादरली आहे. आठ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली असून यात जवळपास १५० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून ४०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. श्रीलंकेच्या राजधानीत तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये लागोपाठ सहा स्फोट झाले यानंतर आणखी दोन बॉम्बस्फोट झाले आहेत.

 

श्रीलंकेच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. सेंट एँथोनी, सेंट सेबास्टिन, सेंट बट्टीकलोआ या तीन चर्चसह हॉटेल शांग्रीला, हॉटेल किंग्सबरी आणि हॉटेल सिनामन या तीन हॉर्लटेमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. याचनंतर कोच्छिकाडे आणि काटुवापिटिया चर्चमध्येही स्फोट घडवून आणण्यात आले.

 

ईस्टर संडेचा उत्सव सुरु असताना विदेशी नागरिकांना लक्ष करण्यात आल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली. मृत्यूमध्ये तब्बल ३५ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. या साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून श्रीलंकेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@