उरी फेम विकी कौशल गंभीर जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2019
Total Views |

 
 
 
उरी या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल याचा भानू प्रताप सिंग यांच्या आगामी भयपटाच्या चित्रीकरणादरम्यान अपघात झाला आहे. गुजरातमध्ये सुरु असलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाप्रसंगी त्याचा अपघात झाला असून त्याच्या गालाला १३ टाके घालावे लागले आहेत.
 
 
 
एका ऍक्शन सिक्वेन्सचे शूटिंग सुरु असताना सेटवरील दार त्याच्या अंगावर कोसळले त्यामुळे त्याला हि गंभीर दुखापत झाली आहे. गेल्या ५ दिवसांपासून या चित्रपटाचे शूटिंग गुजरातमध्ये सुरु होते मात्र आता या अपघातामुळे उपचारांकरिता विकी कौशलला मुंबईत आणण्यात आले आहे. विकी कौशलची तब्ब्येत आता किती दिवसात ठीक होईल आणि चित्रपटाच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात कधी होईल हे लवकारच कळेल.
 
 
 
 
भानू प्रताप सिंग दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत असलेल्या या भयपटात भूमी पेडणेकर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विकी कौशलच्या सर्व चाहत्यांकडून तो लवकर बरा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@