'भारत' चे हे नवे मोशन पोस्टर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2019
Total Views |
 

दबंग स्टार सलमान खान आणि कतरीना कैफ यांच्या भारत या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर आज प्रदर्शित झाले आहे. हा एक प्रकारे चित्रपटाचा टिझर आहे असेही म्हणता येऊ शकेल. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात १९६४, १९७०, १९८५, १९९० आणि २०१० अशा पाच पिढ्या दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची कथा नेमकी काय आहे याची उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या टॅगलाईनवरून या चित्रपाटाचे कथानक एक देश आणि एका व्यक्तीचे जीवन यांचा एकत्रित प्रवास यावर आधारित आहे असे टिझर मध्ये दिसत आहे.

 
 
 
 
 
हिंदी चित्रपट सृष्टीत कायमच नवनवे प्रयोग होत असताना दिसतात, नवे विषय देखील तितक्याच हातोटीने हाताळले जातात. असाच एक नवीन विषय घेऊन 'भारत' हा चित्रपट आपल्या भेटीस येत आहे येत्या ५ जूनला. सलमान खान हा एक मुरलेला अभिनेता आहे. याआधी त्याने वेवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत मग डबल रोल असो, एका दबंग पोलीस ऑफिसरची भूमिका असो किंवा एखाद्या व्यतीचा जीवनपट असो. मात्र या चित्रपटात तो पाच वेगवेगळ्या पिढीतील व्यतीची भूमिका साकारणार आहे. हे त्याच्यासाठी किती आव्हानात्मक आहे ते आता लवकरच कळेल.
 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@