असा असेल रविवारी मेगाब्लॉक
महा एमटीबी   20-Apr-2019



मुंबई : रविवारी २१ एप्रिल रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रूळाच्या देखभालीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी २१ एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मांटुगा ते मुंलुड डाऊन धीम्या, सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे अप- डाऊन तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकात घेण्यात आलेल्या विशेष ट्राफिक आणि पॉवर मेगाब्लॉगमुळेही काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

 

मध्य रेल्वे मार्गावर मांटुगा ते मुंलुड स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. माटुंगाहून सुटणाऱ्या लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावरील वाहतूक सकाळी १०.५७ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यत डाउन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. सीएसएमटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धीम्या मार्गांवरील सर्व लोकल गाड्या सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आपल्या निर्धारित वेळापेक्षा १० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

 

हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ९.५६ ते दुपारी ४.२३ वाजेपर्यंत सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरी, गोरेगाव दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. तर, सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी सकाळी ९.५३ ते दुपारी २.४४ अप-डाऊन वाहतूक बंद राहणार आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातील प्लॅटफार्म क्रमांक ८ वरून पनवेलकरीता स्पेशल लोकल चालवण्यात येणार आहे.

 

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील वाहतुक अप-डाउन धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. दरम्यान काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकात घेण्यात आलेल्या विशेष ट्राफिक आणि पॉवर मेगाब्लॉगमुळे मनमाड रेल्वे स्थानकातून सुटणारी मनमाड- लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस, मनमाड - मुंबई राज्यराणी एक्सप्रेससह भुसावळ - पुणे, हुतात्मा एक्स्प्रेस, भुसावळ -मुंबई पॅसेंजर या महत्वपूर्ण रेल्वे प्रवाशी गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat