राजू शेट्टींचा फिल्मी फंडा
हातकणंगले : अजय देवगणच्या ‘सिंघम’ चित्रपटात जयकांत शिक्रे या मराठी खलनायकाची भूमिका केल्याने प्रकाशझोतात आलेले दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी शुक्रवारी चक्क राजू शेट्टींच्या प्रचारसभेला हजेरी लावली. यावेळी त्यांनी जाहीरसभेला संबोधितही केले. विशेष म्हणजे, प्रकाशराज हेही या निवडणुकीत बंगळुरू सेंट्रल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
राजू शेट्टी यांनी काढलेली किसान संघर्ष यात्रा तसेच शेट्टी यांच्या वाटचालीमुळे प्रकाश राज प्रभावित झाले आहेत. त्यामुळे त्यांनी राजू शेट्टी यांच्या प्रचाराला हातगणंगलेत हजेरी लावल्याचे बोलले जाते. २०१४ मध्ये भाजपसोबत असलेल्या राजू शेट्टी यांना यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat