एकदम कडक कार्यक्रमामध्ये “कागर” विशेष भाग !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2019
Total Views |

 


कलर्स मराठीवरील 'एकदम कडक' या कार्यक्रमाचा येत्या आठवड्यातील भाग विशेष असणार आहे. अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्धी प्राप्त झालेल्या सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि मकरंद माने तसेच ज्यांनी पहिल्याच चित्रपटामध्ये लोकांची मने जिंकली ते रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे एकदम कडकच्या मंचावर येणार आहेत. तसेच वायाकॉम १८ स्टुडीओज प्रस्तुत आणि मकरंद माने दिग्दर्शित कागरहा नवा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

 
 या भागाच्या चित्रीकरणादरम्यान नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू,आकाश ठोसर, सोमनाथ अवघडे आणि अरबाज शेख यांनी बरीच धम्माल मस्ती केली आहे आणि कागर चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. एकदम कडककार्यक्रमाचे येत्या आठवड्याचे भाग सोम ते बुध रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर प्रदर्शित होणार आहेत.
 

 
 

या कार्यक्रमात रिंकू आणि शुभंकर यांनी कागर या चित्रपटातील लागलीया गोडी तुझी या गाण्यावर सुंदर डान्स सादर केलेला डान्स पाहायला मिळेल. कागर या चित्रपटातील संपूर्ण टीमने त्यांचा चित्रिकरणा दरम्यानचा अनुभव, किस्से, त्यांच्या भुमिकेबद्दल आणि कथेबद्दल सांगितले. तेव्हा येत्या भागामध्ये चांगलीच मजा मस्ती प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे यात शंका नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@