पाच वर्षात देशात सहिष्णुता वाढीस लागली: इन्द्रेश कुमार
महा एमटीबी   19-Apr-2019नाशिक : भारतात २०१४ पूर्वी असहिष्णुता होती २०१४ नंतर भारतात सहिष्णुता वाढीस लागली आहे. तसेच, आजमितीस देश प्रगतीपथावर आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा मंच तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत रा. स्व. संघाचे प्रवक्ते इन्द्रेष कुमार यांनी केले. नाशिकच्या हॉटेल ज्युपिटर येथे राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंच तर्फे मिशन शक्ती अंतर्गत आयोजित कार्यक्रमासाठी इन्द्रेष कुमार उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय मुस्लिम मंचच्या पदाधिकाऱ्यांसह पत्रकारांशी संवाद साधला.

 

इन्द्रेष कुमार म्हणाले की, "सरकारने अल्पसंख्यांक वर्गासाठी आजवर महत्वाचे कार्य केले आहे, राष्ट्रीय सुरक्षेबाबत सरकारने मोलाचे कार्य केले आहे. देशात आजमितीस शांतता आहे. देशात कोठेही मोठे हल्ले अथवा जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या घटना घडल्या नाहीत. त्यामुळे देशांतर्गत जातीय सलोखा आहे."

 

यावेळी साध्वी प्रज्ञासिंग यांच्या भोपाळ मधील उमेदवारी बाबत बोलतांना ते म्हणाले की, सहा पैकी चार गुन्ह्यात त्यांना निर्दोषत्व प्राप्त झाले आहे. व ज्या अर्थी त्यांची उमेदवारी निवडणूक आयोगाने ग्राह्य धरली आहे त्याअर्थी त्यांनी निवडणूक आयोगाच्या आवश्यक त्या सर्व अटी शर्थी यांची पूर्तता केली असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंग यांची उमेदवारी योग्य असल्याचे ते यावेळी म्हणाले.

 

तसेच, त्या ही एक माणूस आहेत आणि महिला आहेत त्यामुळे त्यांच्यावर जर काही अत्याचार झाले असतील तर त्यावर त्यांनी भाष्य करणे स्वाभाविक आहे, असे मत इन्द्रेष कुमार यांनी साध्वी प्रज्ञासिंग यांनी हेमंत करकरे यांच्या बाबत केलेल्या विधाना संबंधी बोलतांना व्यक्त केले. यावेळी त्यांनी आझम खान यांच्या वक्तव्याबाबत बोलतांना इन्द्रेष कुमार म्हणाले की, आझम खान यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे धर्म व लोकतंत्र बदनाम होत आहे. सार्वजनिक जीवनात वावरतांना राजकारण्यांनी सभ्यता पाळावी असे ते म्हणाले. त्यांनी, उपस्थितांशी भारताची वादाहत असणारी शक्ती, सर्जिकल स्ट्राईक मूळे जगात वाढलेलाला मान, सक्षम परराष्ट्र धोरण यांसह इतर मुदय्यांची मांडणी उपस्थितांसमोर केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat