आसुसची 'बॅक टू स्कूल ऑफर'
महा एमटीबी   16-Apr-2019मुंबई : यंदाचे शालेय सत्र सुरू होण्यापूर्वी आसुसने बॅक टू स्कूलऑफरची घोषणा केली आहे. यामुळे शालेय दप्तरांचा भार हलका होण्यास मदत होणार आहे. बॅक टू स्कूलऑफरमध्ये आसुसच्या कॉम्पॅक्ट लॅपटॉपवर ग्राहकांसाठी सुलभ ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर व्याज मुक्त ईएमआयसह सादर करण्यात आली असून यात दोन वर्षांपर्यंत वॉरंटी मिळवता येणार आहे.

 

नव्या ऑफरअंतर्गत आसुस नोटबुक्स ४९९ रुपयात १+१ वर्षाची वॉरंटी आणि १७९९ रुपयात १+२ वर्षाच्या वॉरंटीसह मिळत आहे. गेमिंग लॅपटॉपच्या बाबतीत ग्राहकांना फक्त ९९९ रुपये देऊन १+१ वर्षाची आणि २४९९ रुपये देऊन १+२ वर्षाची वॉरंटी एक्स्टेंशनचा फायदा घेऊ शकतात. या ऑफरअंतर्गत निवडक नोटबुक्सवर ग्राहकांना मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम अँड स्टुडन्ट २०१६ वर ५हजार ८०९ रुपायची बचत करता येणार आहे. आसुसची ही ऑफर १० मे पर्यंत चालणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat