.... उससे ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रही हैं - सलमान खान
महा एमटीबी   15-Apr-2019
जितने सफेद बाद मेरे सर और दाढी मै हैं, उससे काहीं ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रही हैं असे म्हणत दबंग स्टार सलमान खान याने आपल्या भारत या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची घोषणा आज केली. 

 

काहीच दिवसांपूर्वी भारत या चित्रपटामधील सलमान खानच्या गुड ओल्ड लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच कतरीना आणि सलमानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. अशातच कतरीनाने भारत या चित्रपटाच्या सेटवरचा तिचा फोटो शेअर केल्यावर तर सोशल मीडियावर याविषयी चर्चा रंगली आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये जॅकी श्रॉफ पण दिसत आहे जो या चित्रपटात सलमान खानच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसून येईल. भारत हा चित्रपट ऍन ऑड टू माय फादर या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे.


 

सलमान खानचे हे ट्विट दिग्दर्शक अली अब्बास झफर, अनिल कपूर, दिशा पटनी, सुनील ग्रोव्हर या कलाकारांनी एक वेगळा ट्विस्ट देऊन सोशल मीडियावर शेअर केले आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच ५ जून २०१९ प्रदर्शित होईल अशी घोषणा सलमान खानने केली आहे.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat