अभिमानास्पद; मोदी बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते!
महा एमटीबी   12-Apr-2019


 


'ट्विपलोमसी'चा वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक अहवाल जाहीर

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक विक्रम नोंदवला आहे. पंतप्रधान मोदींनी फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांना मागे टाकत मोदी फेसबुकवर 'नंबर वन'चे नेते बनले आहेत. ट्विपलोमसी या संस्थेच्या 'वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक २०१९ या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

 

'ट्विपलोमसी'च्या अहवालानुसार, मोदींच्या वैयक्तिक फेसबुक पेजला ४.३५ कोटी लाईक्स आहेत तर त्यांच्याशी जोडलेल्या इतर पेजला जवळपास १.३७ कोटी लाईक्स आहेत. मोदीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ट्रम्प यांच्या फेसबुक पेजला २.३० कोटी लाईक्स आहेत. याशिवाय, ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो हे फेसबुकवर सर्वाधिक वेळ घालवत असल्याचे समोर आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat