'कॅप्टन कूल' माहीला पंचांशी वाद पडला महागात
महा एमटीबी   12-Apr-2019


 


जयपूर : आयपीएलमध्ये जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर गुरूवारी खेळल्या गेलेल्या राजस्थान आणि चेन्नईविरूद्धच्या सामन्यात चेन्नईने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत ४ विकेटने थरारक विजय मिळवला. चेन्नईच्या या रोमहर्षक विजयापेक्षा चर्चा झाली ती कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मैदानावरील त्या कृत्याची.

 

या सामन्यात चेन्नईलाअखेरच्या षटकात विजयासाठी १८ धावांची गरज होती. या षटकात बेन स्टोक्सने टाकलेला चौथा चेंडू पंचांनी 'नो बॉल' न दिल्याने , संतापलेला चेन्नईचा कर्णधार धोनी चक्क सामना चालू असताना डग आउटमधून मैदानात येत पंचांना जाब विचारु लागला. नेहमी कॅप्टन 'कुल' म्हणून ओळखला जाणारा धोनीचे हे 'अँग्री' रूप सर्वानाच आश्चर्य चकित करणारे होते.

 
 
 

सामना झाल्यानंतर आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत धोनीवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई म्हणून धोनीला सामन्यातील ५० टक्के मानधनाचा दंड आयपीएलकडून करण्यात आला आहे.धोनीच्या या अश्या वागण्याची पूर्ण क्रिकेट वर्तुळात चर्चा होत आहे. काहींनी पंचांना दोषी धरत धोनीचे समर्थन केले तर काहींनी धोनीचे हे वागणे खूप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

 

सामना चालू असताना मैदानात येणे हे नियमबाह्य असल्याने धोनीचे चुकीचेच आहे. खेळाडूपेक्षा खेळ आणि त्याचे नियम कधीही मोठे असतात, नियम तोडणे हे कधीही चुकीचेच आहे. त्यामुळे धोनी हा चुकलाच असे अनेक क्रिकेटप्रेमी तसेच दिग्गज खेळाडू सांगत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat