निवडणूक काळात राज्यात आजपर्यंत १०५ कोटी जप्त
महा एमटीबी   12-Apr-2019 

मुंबई : लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून राज्यात विविध कारवायांमध्ये आतापर्यंत १०४ कोटी १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने दिली. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ३५ कोटी रुपये रोकड, सुमारे १९ कोटी १२ लाख रुपये इतक्या किंमतीची दारु, सुमारे ५ कोटी ४६ लाख रुपयांचे अंमली पदार्थ तर ४४ कोटी ६१ लाख रुपये किंमतीचे दागिने आहेत.

 

गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. १४ हजार ९१९ केंद्रावर मतदान पार पडले असून सरासरी ५५.९७ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. दरम्यानच्या काळात केलेल्या कारवाईत १०४ कोटी १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आयोगाने दिली. यासोबतच, निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजल अँपवर नागरिकांनी ७१ हजार २६ तक्रारी केल्या असून यापैकी ५० हजार ८०४ तक्रारी सोडवल्याचे त्यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat