गंभीरने घेतला मेहबुबा मुफ्तींचा समाचार
महा एमटीबी   11-Apr-2019


 

नवी दिल्ली : माजी क्रिकेटर आणि भाजप नेते गौतम गंभीर आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांच्यात कलम ३७० वरून रंगलेल्या ट्विटर युद्धानंतर मेहबुबा यांनी गंभीरला ब्लॉक केले आहे. मात्र, गंभीरने यावर प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. "तुम्ही मला ब्लॉक केले, पण १३० कोटी भारतीय जनतेला तुम्ही कसे ब्लॉक कराल," असा सवाल गंभीरने विचारला आहे.


 
 

नेमके काय म्हणाल्या होत्या मुफ्ती ?

जम्मू काश्मिरमधील स्थायी निवास आणि विशेष दर्जा देणारे कलम ३५ अ रद्द करू नका. आगीशी खेळू नका, कलम ३५ अ शी छेडछाड करू नका, अन्यथा जे १९४७ पासून झाले नाही ते आता होईल, तसे झाले तर माहीत नाही लोक तिरंग्या ऐवजी कोणता झेंडा हाती घेतील. कलम ३७० हटवण्यावरूनही त्यांनी केंद्राला इशारा दिला होता.

 
 

मुफ्ती-गंभीरमध्ये ट्विटर

महबूबा मुफ्ती यांनी ३७० संपवण्याची भाषा करणाऱ्या भारतीयांनी हा इशारा समजून घेतला नाही तर ते गायब होतील, असे विधान मुफ्ती यांनी केले होते. त्य़ावर गंभीरने ट्विट करत भारत हा काही तुमच्या सारखा डाग नाही जो मिटेल, असे रिट्विट केले. त्यावर चिडलेल्या मुफ्ती यांनी ट्विट करत गंभीरला सुनावले. तुमची राजकीय कारकीर्द ही क्रिकेटसारखीच छोटी, असेल, असे ट्विट केले. हे ट्विट बऱ्याच उशीराने केल्यावर गंभीरनेही मुफ्ती यांना सुनावले. "तुम्हाला यावर रिप्लाय द्यायला १० तास लागले. तुमच्या व्यक्तीमत्वातील खोलपणाची उणीव यातून जाणवत आहे. तुम्ही तुमचे मुद्दे यातून सोडवाल, असा विश्वास आहे. यावर चिडून मुफ्ती यांनी गंभीरला पुन्हा ब्लॉक केले. गंभीरने ट्विट करत म्हटले की, "तुम्ही मला ब्लॉक केले, पण आपल्या देशातील १ अब्ज ३६ कोटी ५३ लाख ८६ हजार ४५६ लोकांना कसे ब्लॉक कराल, असे ट्विट गंभीरने करत मुफ्ती यांचा समाचार घेतला.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat