गुगल डूडलद्वारे मतदानाचे आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2019
Total Views |


 

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठे सर्च असलेल्या इंजिन 'गुगल'ने आता मतदान जनजागृती मोहीम सुरू केली आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुढाकार गुगलने खास डुडल तयार केले आहे. या डुडलमध्ये मतदान केल्यानंतर ज्या प्रकारे डुडलवर बोटावर शाई लावण्याची प्रतिमा दिसत आहे. या डुडलवर क्लिक केल्यास केल्यावर मतदानासंबंधी बरीच माहिती दिसत आहे.

 
 
 
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी झाले. देशातील २० राज्यांमध्ये ९१ मतदार संघात तर महाराष्ट्रातील एकूण सात मतदार संघात आज मतदान पार पडले. संपूर्ण जगाचे लक्ष या निवडणूकीकडे लागलेले आहे. गुगल डुडलद्वारे मतदान कशाप्रकारे केले जाते याबद्दल माहीती दिली आहे. यात तुमचे मतदान यादीत नाव कसे शोधाल ?, त्यासाठीचा अर्ज कसा कराल, मतदान करताना काय करावे काय करू नये, व्हीव्हीपॅट म्हणजे काय, याची माहीती यावर दिली आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@