पॅन-आधार जोडणीसाठी पुन्हा मुदतवाढ
महा एमटीबी   01-Apr-2019नवी दिल्ली : पॅनकार्डशी (परमनंट अकाऊंट नंबर) आधारकार्ड क्रमांक जोडणीसाठी केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. पॅन-आधार जोडणीची मुदतवाढ ३१ मार्चपर्यंत होती. मात्र, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतलेल्या निर्णयानुसार आता ही मुदत पुढील सहा महिन्यांपर्यंत वाढवली आहे.


पॅन-आधार जोडणीची ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. सीबीडीटीतर्फे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे रविवारी ही माहिती देण्यात आली आहे. पॅनकार्ड आणि आधारकार्ड जोडणीस आतापर्यंत सहावेळा मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी ३० जून २०१८ ला पॅन-आधार जोडणीची मुदतवाढ ३१ मार्च २०१९ पर्यंत होती.

विवरणपत्र भरताना 'आधार' बंधनकारक

आधार क्रमांकाशी जोडणी केलेले पॅन अवैध ठरु शकतील, अशी चुकीची माहिती पसरल्याने या प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत जरी वाढवली असली तरी प्राप्तिकर विवरणपत्र सादर करताना आधार क्रमांक देणे १ एप्रिलपासून अनिर्वाय असेल, असेही सीबीडीटाने स्पष्ट केले आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat