पुण्यातील पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व
महा एमटीबी   08-Mar-2019
 


पुणे : पाकिस्तानकडून सुरू असणाऱ्या कुरापती आणि त्यामुळे काश्मिर व सीमाभागात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राहणाऱ्या ४५ हिंदूंना भारताचे नागरिकत्व प्राप्त झाले आहे. पाकिस्तानात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने बऱ्याच काळापासून ते पुण्यात वास्तव्याला होते, अनेक प्रयत्नांनंतर त्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्यास यश मिळाले आहे. दरम्यान भारतीय नागरिकत्व मिळाल्याबद्दल या कुटूंबियांनी आनंद व्यक्त केला.

पाकिस्तानात हिंदू समाज अल्पसंख्यांक वर्ग गणला जातो. त्यामुळे तिथे राहताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी हा परिवार बरेच वर्ष प्रयत्नशील होता. भारताचे नागरिक झाल्याने आमच्या प्रयत्नांना यश आल्याचे मत जयप्रकाश नेभवाणी यांनी सांगितले.पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. भारताचे अधिकृतरित्या नागरिक झाल्याने आम्ही समाधानी आहोत, अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली. पाकिस्तानात प्रतिकूल परिस्थितीने भ्यायलेले हे सर्वजण नोकरीसाठी पुण्यात आले. अनेक वर्ष त्यांनी पुण्यात वालस्तव्य केले. भारतीय नागरिकत्व नसल्याने इथेही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या मुळ कागदपत्रांची सत्यता पडताळून त्यांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे.
 

नागरिकत्व कायद्यात बदल

१९६६च्या भारतीय नागरिकत्व कायद्यातील बदलामुळे भारतीय नागरिकत्व कायद्यात २०१६मध्ये बदल करण्यात आला. नव्या कायद्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर देशाचे नागरिकत्व प्रदान करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. एकेकाळी भारताच्या भूमीचा भाग राहिलेल्या अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशात अल्पसंख्य असणाऱ्या नगिरकत्व देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat