Women's Day Special : रणरागिणी क्रीडा विश्वातल्या...
महा एमटीबी   08-Mar-2019८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खेळ म्हंटले की लक्षात राहतात ते पुरुषांचे क्रीडा क्षेत्रात असलेले वर्चस्व. परंतु बदलत्या काळानुसार स्त्रीयांचे वर्चस्वही दिसून येत आहे. राजकारण, उद्योजक, पत्रकारिता याबरोबरच खेळातही स्त्रीशक्तीची प्रमाण दिसून आले आहे. क्रिकेट, हॉकी, नेमबाजी तसेच बॉक्सिंग, कुस्तीसारख्या मर्दानी खेळातदेखील महिलांनी आपले वर्चस्व गाजवले. म्हणूनच आज महिला दिनाचे औचित्य साधून सध्याच्या घडीला जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताचे नेतृत्व करत असलेल्या महिलांविषयी थोडक्यात जाणून घेऊया...

 

स्मृती मंधाना

 

 
 

सांगलीची कन्या स्मृती मंधाना ही सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करते आहे. तिने कमी वयात क्रिकेट जगतात अनेक ध्येय साध्य केले. तिला ओळख मिळाली ती २०१७च्या विश्वचषक स्पर्धेमुळे आणि २०१८मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकमधल्या तिच्या कामगिरीमुळे.

 

पी.व्ही. सिंधू

 

 
 

फुलराणी पी.व्ही. सिंधू ही बॅटमिंटन या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करते.ती ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली खेळाडू तसेच ऑलिंपिक खेळात रौप्य पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. २०१८मध्ये तिने कॉमनवेल्थ स्पर्धा, आशियाई स्पर्धा तसेच जागतिक चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.

 

मेरी कॉम

 

 
 

आयर्न लेडी मेरी कॉम हिने भारतीय बॉक्सिंग क्षेत्रात परमोच्च शिखर गाठले आहे. वयाच्या ३६व्या वर्षी आणि तीन मुलांची आई असतानादेखील मेरी कॉमने २०१८मध्ये आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पाचव्यांदा सुवर्ण पदक जिंकले होते. तिने प्रत्येक स्पर्धेमध्ये पदकाला गवसणी घातली आहे. एका अतिसामान्य कुटुंबातून असताना देखील जीवनातील संकटांशी मुकाबला करत प्रत्येक यशाला गवसणी घातली आहे.

 

दीपा कर्माकार

 

 
 
 

ऑलीम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली महिला भारतीय जिम्नास्ट म्हणून दीपा कर्माकार हिची ओळख आहे. मागील ५२ वर्षात अशी कामगिरी करणारी पहिलीच भारतीय ठरली. २०१६मध्ये झालेल्या समर ऑलीम्पिक्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

 

साक्षी मलिक

 

 
 

भारतासाठी ओलीम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय कुस्तीपटू म्हणून साक्षी मालिकांचे नाव घेतले जाते. २०१६मध्ये झालेल्या ऑलीम्पिकमध्ये साक्षी मलिकने काँस्य पदक जिंकले होते. ते ऑलीम्पिक २०१६मधले पहिले पदक होते. त्यानंतर साक्षी मलिकने भारतीय महिला कुस्ती क्षेत्रात नाव कमावले आहे.

 

- अभिजीत जाधव

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat