असा आहे ‘कलंक’चा फर्स्ट लूक!
महा एमटीबी   07-Mar-2019


 
 
 
मुंबई : दिग्दर्शक करण जोहरच्या बहुचर्चित सिनेमा ‘कलंक’ चे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. आलिया भट, वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दिक्षित-नेने सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर अशी या सिनेमाची तगडी स्टारकास्ट आहे. संजय दत्त आणि माधुरी दिक्षित या सिनेमाच्या निमित्ताने तब्बल २१ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. अभिनेता वरुण धवन, आदित्य कपूर आणि संजय दत्त यांचा या सिनेमातील लूक करण जोहरने शेअर केला आहे.
 
 
 
 
 

येत्या १९ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कलंक’ या सिनेमाची कथा भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित आहे. १९४० च्या दशकातील कालखंड या सिनेमात दाखविण्यात येणार आहे. वरुण धवन या सिनेमात जफर ही व्यक्तिरेखा साकारत असून संजय दत्त बलराज चौधरीच्या भूमिकेत दिसतील. अभिनेता आदित्य रॉय कपूरने या सिनेमात ‘देव’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. अभिषेक वर्मन या सिनेमाचे दिग्दर्शन करत असून साजिद नाडियावाला आणि करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सने एकत्रितपणे या सिनेमाची निर्मिती केली आहे.

 
 
 
 

दरम्यान, दिग्दर्शक करण जोहर याने ‘कलंक’ हा सिनेमा त्याच्या वडिलांचे स्वप्न असल्याचे म्हटले आहे. १५ वर्षांपूर्वीची करण जोहरच्या वडिलांनी त्यांच्या निधनापूर्वी या सिनेमावर काम केले होते. तेव्हा करण हे स्वप्न पूर्ण करू शकला नाही. पण आता या स्वप्नाला एक दिशा मिळाली आहे. असे करण जोहरने या सिनेमाविषयी म्हटले.

 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat