
नवी दिल्ली : जगभरात तसेच देशभरात प्रसिद्ध असलेली हिंदुस्थान यूनिलिवर लिमिटेड (एचयुएल) ही कंपनी त्यांच्या विविध उत्पादनासाठी ओळखली जाते. यांनी प्रसिद्ध केलेल्या रेड लेबल चहाच्या जाहिरातीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या जाहिरातीमध्ये कुंभमेळ्याचा उल्लेख करताना 'वृद्ध पालकांना सोडले जाते अशी जागा' असा करण्यात आला आहे. अशा आक्षेपार्ह संदेशामुळे सोशल मीडियावर या कंपनीविरोधात टीकेची झोड उठली आहे. सध्या या संबंधित #BoycottHindustanUnilever हा हॅशटॅग ट्रेंडिंग होत आहे.
(आधी प्रसिद्ध केलेली जाहिरात)
'एचयूएल'ने ट्विट करताना "हृदयस्पर्शी व्हिडिओ: डोळे उघडणारा आणि कठोर वास्तव सांगणारा" असे शीर्षक देऊन प्रसिद्ध केला होता. त्यानंतर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी पहिला व्हिडिओ काढून लगेच दुसरा प्रसिद्ध केला गेला गेला. " आपण कोण आहोत हे ओळख करून देणाऱ्यांचे हात पकडण्यासाठी रेड लेबल चहा आपल्याला प्रोत्साहित करतो" अशा शीर्षकाने पुन्हा ही जाहीहरात प्रसिद्ध केली गेली. यामध्ये एका पिता पुत्रांचे नाते दाखवले गेले आहे. त्यानंतर एक संदेश देण्यात येतो, " कुंभमेळा ही सर्वात मोठी धार्मिक सभा आहे. या सभेमध्ये कुटुंबाकडून बऱ्याच वृद्धांना सोडून दिले जाते." पुढे अजून एक संदेश येतो तो म्हणजे "या कुंभमेळ्यात त्यांचे हात पकडू ज्यांनी आपल्याला आपली ओळख करून दिली."
.@RedLabelChai encourages us to hold the hands of those who made us who we are. Watch the heart-warming video #ApnoKoApnao pic.twitter.com/P3mZCsltmt
— Hindustan Unilever (@HUL_News) March 7, 2019
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat