वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांनी दिला ‘हा’ संदेश!
महा एमटीबी   07-Mar-2019


 
 
 
मुंबई : बॉलिवुडमधील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा आज ६४ वा वाढदिवस! वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांनी एक महत्त्वपूर्ण संदेश आपल्या चाहत्यांना दिला आहे. ‘या जगात जर माझे आयुष्य कोणी बदलू शकत असेल तर ती एकमेव व्यक्ती मीच आहे. माझ्या आयुष्यात बदल मीच आणू शकतो, माझ्यासाठी हे काम दुसरे कोणी करू शकत नाही. तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणायचा असेल तर तो फक्त तुम्हीच घडवून आणू शकता’. असा महत्त्वपूर्ण संदेश अनुपम खेर यांनी त्यांच्या चाहत्यांना दिला आहे. अनुपम खेर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
 
 
 
 

“हाय इंडिया! आज माझा वाढदिवस आहे. न्यूयॉर्कमध्ये माझा वाढदिवस उद्या असेल. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा! मी माझा जीवनप्रवास आणि जीवन जगण्याचा माझा मंत्र या एका मिनिटाच्या व्हिडिओद्वारे शेअर करत आहे.असे कॅप्शन त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना लिहिले होते. तसेच चला आता सगळ्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या!” असेही त्यांनी मिश्किलपणे कॅप्शनमध्ये लिहिले होते. अनुपम खेर हे एक अष्टपैलु व्यक्तिमत्त्व आहेत. बॉलिवुड सिनेमांमध्ये आजवर त्यांनी अनेक विनोदी भूमिका साकारल्या. अनेक सिनेमांमधून अनुपम खेर यांनी खलनायकही रंगवले. गंभीर भूमिकाही त्यांनी साकारल्या. अनुपम खेर यांच्यावर आज सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat