‘जंगली’चा धमाकेदार ट्रेलर!
महा एमटीबी   06-Mar-2019

 

 
 
 
मुंबई : अभिनेता विद्युत जामवालच्या बहुप्रतिक्षित ‘जंगली’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ‘कमांडो’फेम विद्युत जामवालचे अॅक्शन सीन्स जंगलीमध्येही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमाची नायिका आहे. मराठी अभिनेता अतुल कुलकर्णीने जंगलीमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. जंगली हा प्राणीप्रेमी आणि वन्यजीव सुरक्षेवर आधारित सिनेमा असून हॉलिवुडचे प्रसिद्ध दिग्दर्शक चक रसेल यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
 
 
 
 

अभिनेता विद्युत जामवाल सिनेमात एका प्राणीप्रेमी तरुणाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसेल. बालपणीपासून जंगलातील हत्तीला आपला मित्र बनवणारा मुलगा मोठा होऊन त्या जंगलाचे आणि जंगलातील इतर जीवांचे संरक्षण करू पाहतो. अशी या सिनेमाची कथा आहे. पण जसा प्रत्येक जंगलाचा एक शिकारी असतो आणि त्याची गाठ प्राणीप्रेमी नायकाशी पडते. तसेच सिनेमात प्राणीप्रेमी विद्युतचा सामना शिकाऱ्याच्या भूमिकेतील अतुल कुलकर्णीसोबत होणार आहे. सिनेमा विद्युतचा असल्याने त्यात पॉवरपॅक्ड अॅक्शन सीन्स असणार यात शंका नाही. प्राणीप्रेमींच्या आयुष्याला समर्पित असलेला जंगली हा सिनेमा बॉक्सऑफिसवर किती धुमाकुळ घालणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागणार आहे. येत्या ५ एप्रिल रोजी जंगली सिनेमागृहात प्रदर्शित होईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat