रंगला कलोत्सवाचा मेळा : ‘भारतीय कलामोहोत्सव २०१९’चा शानदार समारोप
महा एमटीबी   06-Mar-2019मुंबई : रोजच्या अभ्यासासह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या  नॉलेज बुक लायब्ररी अ‍ॅण्ड मल्टी अ‍ॅक्टीव्हीटी सेंटर एलएलपी’ ‘(केएलएसी) आयोजित आणि डॉ. जयश्री साठे-छेडा यांच्या संकल्पनेतून साकारलेला भारतीय कलामोहोत्सव २०१९हा शानदार सोहळा माटूंगा येथील म्हैसूर हॉल येथे सोमवार, दि. ४ मार्च रोजी पार पडला.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना देवदत्त धानोकर, विनय वत्स, प्रा. महेश वाघ, मंदार चित्रे, अमृत देशमुख आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. अमृत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून देत त्यांच्या मिशनची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.  
आपल्या १५० शब्द प्रतिमिनिटांपासून बाराशे शब्द प्रतिमिनिटांपर्यंतची क्षमता वाढवण्याबद्दल कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. दिवसाला एक पुस्तक वाचून पूर्ण करणाऱ्या अमृत यांनी आपल्या अनुभव कथनाद्वारे विद्यार्थ्यांची मने जिंकली.
 
 
अभियांत्रिकी प्रशिक्षण देणाऱ्या Ekeeda.com या वेबपोर्टलचे संस्थापक प्रा. महेश वाघ यांनीही विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र दिला. लेखक मंदार चित्रे यांनी विद्यार्थ्यांची मनमोकळा संवाद साधला. विनय वत्स यांनी आपल्या समाजकार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.
 
 
 

केएलएसीतर्फे वर्षभर घेण्यात आलेल्या विविध कलास्पर्धांचा निकाल आणि बक्षिस वितरण कार्यक्रम सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी गिटार, ड्रम्स्, किबोर्ड़, बासरीवादन गायन आदी कलागुणांचे उपस्थितांची मने जिंकून घेतली.

 पाश्चात्य आणि लोककला नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाचा हा आगळावेगळा कार्यक्रम पाहून पालकही हरखून गेले.

डॉ. जयश्री साठे छेडा यांनी  मनसेेचे माजी नगरसेवक आणि केएलएसी शुभचिंतक संतोष धुरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat