काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीच्या नेत्यांचा स्वतःवरच विश्वास नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2019
Total Views |


 

 

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणतात की त्यांचेच कोणी पक्षात ऐकत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जे बोलतात ते करतच नाहीत. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीतील नेत्यांचा स्वतःवरच विश्वास नाही मग महाराष्ट्राने त्यांचे का ऐकावे असा प्रश्न आहे. अशा स्थितीत एकमुखाने जे बोलतात आणि जे बोलतात ते करून दाखवतात अशा भाजपा सेना महायुतीसोबतच राज्यातील मतदार राहील, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी लगावला. भारतीय जनता पार्टी, प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीची आज पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेतुनच कळलं ५६ इंच छाती असणाऱ्या नेत्याच्या विरोधात ५६ पक्ष आणि संघटना महाराष्ट्रात एकत्र आल्या आहेत. पण असं झालं तरी महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचा कुठे ही टिकावं लागणार नाही हे वास्तव आहे.

 

त्यांनी सांगितले की, अशोक चव्हाण म्हणतात त्यांचं कोणी ऐकत नाहीत. विखे पाटील म्हणतात त्यांचं कोणी ऐकत नाहीत. शरद पवार जे बोलतात ते करतच नाहीत. त्यांनी सांगितले की, पार्थ लढणार नाही पण तो आता लढत आहे. त्यांनी सांगितले की, माढा मतदारसंघात ते लढतील आता लढणार नाहीत. त्यांनी सांगितले की, पुलवामा घटनेचा बदला घेण्यासाठीचा हल्ला त्यांच्याच सल्ल्याने झाला आणि आता ते म्हणतात की, ते सांगितलंच नव्हतं. काँग्रेसच्या अशोक चव्हाणचं कोणी ऐकत नाहीत. विखेचं कोणी ऐकत नाहीत, पवार जे बोलतात ते करत नाहीत मग महाराष्ट्रांनी याचं का ऐकावं हा प्रश्न आज महाराष्ट्रातल्या मतदारासमोर नक्की उभा आहे. ते म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी असा आरोप केला आहे की, भाजप फोडाफोडीचं राजकारण करत आहे. प्रत्यक्षात चव्हाण साहेबांनी चंद्रपूरमध्येधानोरकरांना राजीनामा द्यायला लावला, त्यांना चंद्रपूरचं तिकीट देतो म्हणाले आणि त्यांना तिकीट दिलं नाही. तुम्हाला तुमची लोकं सांभाळता येत नाहीत, तुमचं कोणी ऐकत नाहीत, मग तुमच्याकडे का लोक राहतील. शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवुन रणजितसिंह मोहिते- पाटलांनी कसं भविष्य घडवायचं.

 

त्यांनी सांगितले की स्वाभीमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला. प्रत्यक्षात केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोग लागू केला. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. असे असताना ज्या राजू शेट्टींना शरद पवार अविश्वासू वाटायचे,चोरांचा राजा आणि जातीयवादी वाटायचे त्या शरद पवारांच्या महाआघाडीमध्ये आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या शरद पवारांच्या मांडीला लाऊन शेतकऱ्यांचा नेता म्हणणारा नेता का बसला, अशी कोणती मजबुरी होती हे त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना स्पष्ट केले पाहिजे. बारामतीला शेतकऱ्यांच्या प्रश्नी आंदोलन करणारा शेतकऱ्यांचा नेता त्या बारामतीच्या चरणी जात आहे, असे शेतकऱ्यांचे वाईट चित्र कधीही नव्हते. ते राजू शेट्टींच्या कृतीमधून दिसते आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@