पाकिस्तानात हिंदू मुलींचे केले जातेय जबरदस्ती धर्मांतर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2019
Total Views |




इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. होळी साजरी करत असताना दोन हिंदू अल्पवयीन बहिणींचे अपहरण करण्यात आले आहे. एवढंच नाही तर, अपहरण करून या दोघींचे लग्न लावून धर्म बदलण्यात आले आहेत. यातील पीडित रविना ही अवघ्या १३ तर रीना ही १५ अवघ्या पंधरा वर्षाची आहे. या घटनेनंतर पाकिस्तानातील हिंदूंनी तीव्र संताप व्यक्त मोठ्या प्रमाणात निदर्शने केली आहेत. यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतली आहे.

 

पाकिस्तान हिंदू वेलफेअर ट्रस्टचे प्रमुख संजेश धंजा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, "रविना आणि रीना या दोघींचे सिंध प्रांतातील घोटकी येथून अपहरण करून लागण लावण्यात आले व यानंतर त्यांचे धर्म बदलण्यात आले. अशा प्रकारच्या हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना पाकिस्तानात नेहमीच होत आल्या आहेत. यावर आम्ही वारंवार आवाज उठवत असतो मात्र, पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत."

 

रविना आणि रीना यांच्यासोबतच याच परिसरातील कोमल आणि सोनिया या दोन मुलींचे देखील अपहरण करण्यात आले असून जबरदस्तीने त्यांचे मुस्लिम तरुणांशी लग्न लावून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता, ये नया पाकिस्तान असल्याचे सांगणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यावर काय भुमीका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@